सशक्त समाज निर्मितीसाठी कटीबद्ध रहा

0

जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे ; रावेरला ईफ्तार पार्टी

रावेर- सर्व वाईट घटनांना रोखण्याची ताकद रोजामध्ये असून पवित्र रमजान महिन्याचे पावित्र्य कायम राखून सशक्त समाज व देश निर्माण घडविण्यासाठी कटीबध्द रहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी येथे केले. रावेर पोलिस स्टेशनतर्फे बुधवारी सायंकाळी रमजान महिन्यानिमित्त ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष दारा मोहेम्मद, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, डीवायएसपी राजेंद्र रायसिंग, तहसीलदार विजयकुमार ढगे, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी नगराध्यक्ष हरीष गणवानी, शीतल पाटील, ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, दिलीप कांबळे, नगरसेवक आसीफ मोहम्मद, सुधीर पाटील, कलिम मेंबर, सादीक मेंबर, अय्यूब खान, असदउल्ला खान, गयास शेख, महेमूद मन्यार, यूसुफ खान, अब्दुल रफीक, कालू पहेलवान, एम.ए.खान, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, फौजदार उीपक ढोमने, पंकज वाघ, डी.डी.वाणी, मुन्ना अग्रवाल, अशोक शिंदे आदी मुस्लिम पंच कमेटी व शांतता कमेटी सदस्य उपस्थित होते.