ससाणेनगर येथील सिग्नल यंत्रणा सुरू

0

हडपसर ।  ससाणेनगर महंमदवाडी रस्त्यावरील जीवघेण्या वाहतूककोंडीवर उपाययोजना म्हणून ससाणेनगर नागरी कृती समिती, पुणे महापालिका, वाहतूक विभाग, हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक योगेश ससाणे, संघटना, नागरिकांच्या मागणी यांमुळे व पाठपुराव्यामुळे नवनाथ तरुण मंडळ चौक याठिकाणी वाहतूक सिग्नल चालू करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून चौक व रस्त्यावरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी ससाणेनगर नागरी कृती समिती व इतर संघटना, सह्या आंदोलन, निवेदन देऊन वाहतूक सिग्नलची मागणी केली होती. या चौकात आगामी काळात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी ससाणेनगर नागरी कृती समितीच्या वतीने यावेळी करण्यात आली. सिग्नलच्या उद्घाटनप्रसंगी समितीचे मुकेश वाडकर, दिलीप गायकवाड, अनंत झांबरे, वैभव माने, संजय शिंदे, मिलिंद वाडकर, इम्रान मणियार, संतोष सोनावणे, संजय मेहता, महेश पवार, नगरसेवक योगेश ससाणे, मारुती तुपे, वैशाली बनकर, उज्ज्वला जंगले, अशोक कांबळे, प्रमोद भानगिरे, प्राची आल्हाट हडपसर वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे व उपनिरीक्षक संजय जाधव व या भागातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यास कटीबद्ध
ससाणेनगर येथील वाहतुकीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, येथे पालिकेच्या माध्यमातून सुविधा मिळाव्यात व सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र येऊन काम करू व येथील वाहतूक सुरळीत करू.
योगेश ससाणे, अध्यक्ष, प्रभाग समिती हडपसर