ससूनची नवीन इमारत उद्यापासून कोरोनासाठी कार्यान्वित

0

पुणे: कोरोनाच्या रूग्ण संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे. राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालये सुरू करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील ससून रुग्णालयाची नवीन 11 मजली इमारत उद्यापासून अर्थात सोमवारी कार्यान्वित होणार आहे. यात कोरोनाशी संबंधितच रुग्णांवर उपचार केले जाणार आहे अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसकर यांनी दिली आहे. रूग्ण अलगिकरण, विलगिकरण तसेच अतिदक्षता विभाग असणार आहे. विभागीय आयुक्त यांनी या इमारतीला भेट दिली असून तपासणी केली आहे. उद्यापासून त्याठिकाणी यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.