पुणे: येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ‘ससून’ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने बुधवारी सायंकाळी तडकाफडकी बदली केली. त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याचा सहसंचालक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. ससूनमध्ये रुग्णालयात करोनाच्या रुग्णांचा मृत्यूदर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बदली झाल्याची चर्चा आहे.
पुण्यात करोनाच्या संसर्गाने सर्वाधिक मृत्यू होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयावर टीकेची झोड उठविली जात होती. या संदर्भात टीका सुरू राहिल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. चंदनवाले यांची बदली करण्यात आली आहे.