ससूनला व्हेंटिलेटरची भेट

0

पुणे । आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीतून ससून रुग्णालयातील बालरोग विभागाला 12 लाख रुपयांचे व्हेंटिलेटर मशीन नुकतेच भेट देण्यात आले. येथे येणार्‍या रुग्णांची संख्या लक्षात घेता व्हेंटिलेटर मशीनची नितांत गरज होती. त्यामुळे गाडगीळ यांच्या आमदार निधीमधून हे व्हेंटिलेटर मशीन बसविण्यात आले.

यावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, बालरोग विभागप्रमुख डॉ. आरती किणीकर, डॉ. शिल्पा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षण व आरोग्य यावर आमदार निधीमधून जास्तीत जास्त खर्च करण्यावर आमचा भर असतो. ससूनला यापुढील काळात देखील आम्ही मदत करणार असून ससून रुग्णालयासाठी सुसज्ज अशी रुग्णवाहिका देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे आश्वासन गाडगीळ यांनी दिले.