सहकारनगर । गजानन महाराज मंदिर परिसरात फुटपाथवर हारफुले, फळे, खाद्मपदार्थ विक्रिते व टपर्या यांनी फुटपाथ काबीज केला आहे. यामुळे सकाळ-संध्याकाळी वाहतूककोंडी, पादचार्यांना त्रास होतो आहे. या चौकातून डाव्या हाताला वळल्यास अरणेश्वर रस्त्यावर मध्येच नाल्यावर बराच दिवसांपासून कचरा भरून पडलेला टेम्पो, कचरा, पाइपलाइन, बांबूची तुकडे व एलईडीचा खांब पडून आहेत. पुढे अरेणश्वर रोड ते मित्रमंडळ चौकापर्यंत नावालाच फक्त फुटपाथ आहेत.
या फुटपाथवर तरुण मुले, मध्यम व्यक्ती पत्ते खेळत असतात. फळे विक्रेते, अर्धवट फुटपाथ त्यांच्या पुढे चहा टपर्या, इतर विक्रेते व ज्यांचे फुटपाथला लागून बंगले आहेत. त्यांच्या गाड्या व्यवस्थित पार्किंगमध्ये जाण्यासाठी फुटपाथ कमी उंचीचे करून रस्त्याला समांतर केलेले दिसतात. पर्वती दर्शन येथील भाजी विक्रेत्यांना गाळे दिले आहेत. पण त्या गाळ्यामध्ये भाजीपाला न ठेवता रस्त्यावर विक्रीसाठी ठेवतात. यामुळे संध्याकाळी वाहतूककोंडी होते.बाजूच्या कचराकुंडीमध्ये नसलेल्या भाज्या फेकल्या जातात. याचा त्रास नागरिकांना होत असतो.