मुंबई – सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना सेबीने धक्का दिला आहे. गुंतवणुकदारांचे ७५ कोटी रुपये परत न केल्याने देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेची खाती गोठवण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. त्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची होण्याची शक्यता आहे.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मालकी असलेल्या लोकमंगल समुहाने गुंतवणुकदारांकडून घेतलेले ७५ कोटी रुपये तीन महिन्यांत परत करावेत, असे आदेश सेबीने दिले होते. मात्र हे पैसे विहीत कालावधीत परत करण्यात न आल्याने अखेर सेबीने लोकमंगल समुहावर कारवाई केली आहे.