सहकारी बँक घोटाळा: अजित पवार यांच्यासह संचालक मंडळ सुप्रीम कोर्टात

0

मुंबई: सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. हा आदेश अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे. दरम्यान अजित पवार यांच्यासह संचालक मंडळाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

राज्य सहकारी बँकांच्या २५ हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. सुरींदर अरोरा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने निर्देश देत पुढील पाच दिवसात गुन्हा दाखल करा करण्याचे आदेश दिले आहे. याला स्थगिती मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.