पिंपरी : सहकारी महिला कर्मचार्यांशी अश्लिल वर्तन, तसेच वरिष्ठ अधिकार्यांना बेजबाबदार उत्तर देणार्या चिंचवड वाहतूक शाखेत नुकतेच बदली होऊन आलेल्या पोलीस नाईकाचे निलंबन करण्यात आलेले आहे. संपत ज्ञानदेव नागरगोजे असे त्यांचे नाव आहे. काही कारणास्तव पुण्यातून 15 दिवसांपूर्वी चिंचवड वाहतूक शाखेत करण्यात आलेली होती.
दरम्यानच्या काळात नागरगोजे यांच्या विरोधात सहकारी महिला कर्मचार्याने वरिष्ठांकडे अर्ज करून मानसिक त्रास देत असल्याचे तक्रार दिली होती. तसेच शिवाजीनगर मुख्यालयात वाहतूक कवायत आणि वाहतूक नियमनाबाबातचे महत्वाचे प्रशिक्षण आयोजित केले होते. यासाठी ते प्रशिक्षणास उपस्थित राहिले नाहीत. तसेच वरिष्ठांनी विचारणा केली असता त्यांनी बेजबाबदार आणि बेशिस्त उत्तरे दिली. असा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनांची कारवाई करण्यात आलेली आहे.