सहकारी संस्था व्यवस्थापन अभ्यासक्रम वाशी येथे संपन्न

0

नवी मुंबई । नवी मुंबई को-ऑपरेटिव्ह फेडरेशनचा ‘सहकारी संस्था व्यवस्थापन’ वाशी येथील झुलेलाल मंदिर सभागृहात संपन्न झाला. 2010 पासून या अभ्यासक्रम वर्गास सुरुवात झाली आहे. यंदा 9 व्या तुकडीमधून उत्तीर्ण झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यात आले व 19 व्या तुकडीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सहनिबंधक सहकारी संस्था सिडकोचे शरद जरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फेडरेशनचे सचिव या अभ्यासक्रमाचे सचिव के. सोमकुमार यांनी सांगितले की, सहकारी संस्थांचे उत्तम व्यवस्थापन करण्याकरिता प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील महसंघांनी अभ्यासक्रम तयार करून व्यवस्थापक तयार करावेत असा आदेश दिला होता. त्यानुसार नवी मुंबई को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन हे महाराष्ट्रातील पहिला महासंघ बनला आहे ज्यांनी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.तसेच सहकारी संस्था व्यवस्थापन हा अभ्यासक्रम माफक दरात उपलब्ध करून देणारा नवी मुंबई फेडरेशन हा पहिला महासंघ आहे. या अभ्यासक्रमातून आजपर्यंत 250 हुन अधिक व्यवस्थापक घडले आहेत ज्यांचा नवी मुंबई व इतर शहरांतील संस्थाना त्याचा लाभ झाला आहे.