सहकार्‍यांनी घेतली व्यसनापासुन दुर राहण्याची प्रतिज्ञा

0

जळगाव । जैन इरिगेशनतर्फे जागतिक तंबाखु विरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जागतिक धुम्रपान आणि मद्यपान निषेध दिन पाळुन कंपनीतील सहकार्‍यांनी तंबाखु व तत्सम व्यसनांपासून लांब राहण्याची प्रतिज्ञा घेतली. दरम्यान याप्रसंगी चेतना व्यवसनमुक्तीचे नितीन विसपुते आणि डॉ. गांधी यांनी जैन इरिगेशनमधील सहकार्‍यांना व्यसनमुक्तीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. जैन इरिगेशनच्या प्लास्टीक पार्क येथील डेमो हॉलमध्ये झालेल्या या उपक्रमात 160 सहकार्‍यांनी सहभाग घेतला. यावेळी कंपनीतील वरिष्ठ सहकारी सुध्दा उपस्थित होते.

विविध विषयांवर चर्चा
श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्याकडे प्रचंड दुरदृष्टी होती. त्यातुनच मोठ्याभाऊंनी तंबाखुचा धोका ओळखुन आपल्या उद्योगाला आणि सहकार्‍यांना तंबाखु व तत्सम व्यसनांपासून लांब ठेवले. आदरणीय भाऊंच्या विचारांतुन कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी व्यसनमुक्तीसाठी मोहीमच उभारली आहे. यासाठी ‘व्यसनाची नशा करी अनमोल जीवाची दुर्दशा’ या ब्रिदनुसार विविध व्यसनमुक्ती जनजागृतीपर उपक्रम राबविले. त्याचाच भाग म्हणुन आज जागतिक तंबाखु विरोधी दिनी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.

व्यसनमुक्ती केंद्राचे मार्गदर्शन
यावेळी तंबाखुचे व्यसन, त्यापासुन होणारे तोटे, आजार आणि त्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या विषयावर चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी मार्गदर्शन केले. डॉ. गांधी यांनी जगामध्ये होणार्‍या कर्करोगामध्ये निम्यापेक्षा जास्त कर्करोग हे तंबाखुजन्य पदार्थ सेवन केल्याने होतात. त्यामुळे या पदार्थांचे धोके लक्षात घेता सर्वांनीच त्यापासुन लांब राहिले पाहिजे, असे डॉ. गांधींनी सांगितले. यावेळी उपस्थितांना व्यवसनापासुन दुर राहण्याची प्रतिज्ञा नितीन विसपुते यांनी दिली.