सहकार क्षेत्रातील वाढते राजकीय हस्तक्षेप विकासास बाधक

0

जळगाव। ‘वि ना सहकार नाही उध्दार’ असा नारा देत सहकार क्षेत्राची मुहुर्तमेठ रोवली गेली. मात्र आज सहकार क्षेत्रात मोठे राजकीय हस्तक्षेप वाढले आहे. सहकारात क्षेत्रातील वाढते राजकारण हे सहकाराच्या विकासास बाधक असून राजकीय हस्तक्षेप हे दुर्देव असल्याचे प्रतिपादन जळगाव जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिंमतराव देशमुख यांनी केले. सहकार बोर्डाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार स्मिता वाघ, महाविर बँकेचे अध्यक्ष दुलिचंद जैन, कवी ज्ञानेशजी मोरे सतिश शिंदे, नारायण चौधरी, दिपक सुर्यवंशी, आर.जी.पवार, शकीना तडवी, विजया चौधरी आदी उपस्थित होते.

81 व्या वर्षात पदार्पण
स्वातंत्र्यपूर्व काळात शासकीय कर्मचार्‍यांसाठी जिल्हा सहकारी बोर्डाची निर्मिती झाली. शनिवारी 10 रोजी बोडोच्या स्थापनेला 80 वर्ष पुर्ण झाले असून बोर्डाने 81 व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. संस्थेतर्फे सामाजिक कार्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. पावसाळ्यातील पाणी वाया जाऊ नये यासाठी संस्थेने स्वःखर्चाने रेन वॉटर हॉर्व्हेस्टिंग प्रकल्प राबवित आहे. महिलांसाठी देखील विशेष उपक्रम बोर्डातर्फे राबविले जात आहे.

महिला बचत गटाला प्रोत्साहन
सहकार बोर्डातर्फे महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन महिला रोजगार वाढावे यासाठी संस्थेतर्फे महिला बचत गटांना उत्पादने विक्रीसाठी दोन वर्ष मोफत जागा उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यावेळी महिला बचत गटाद्वारे निर्मिती केल्या गेलेल्या साहित्य प्रदर्शन करण्यात आले. महिला बचत गटाला कर्ज पुरवठा होऊन रोजगार वाढावा यासाठी शुन्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार स्मिता वाघ यांनी विधी मंडळात यापूर्वी केली आहे. मागणी मान्य झाली असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.