सहकार महाराष्ट्रात सशक्त पण आयकरातुन सुटका मिळाल्यास अधिक प्रगती

0

चोपडा । बँकिंग व्यवसाय करणे कठीण झाले आहे. कर्जाचे व्याज दर कमी झाले. त्यामुळे ठेवींना माफक व्याज देणे अवघड होत आहे. बॅकेच्या कर्जासाठी चोख व्यवहार करणारे कर्जदार शोधणे जिकरीचे ठरते. एनपीए मधून निघण्यासाठी बॅकेने पारदर्शक पद्धतीने कर्जांचा विचार करावा. पीपल्स बॅकेने अत्यंत कठीण परिस्थितीत उत्तम व्यवसाय करुन सातत्य ठेवत नावलौकिक कमविला आहे. बॅकेचा अमृत महोत्सव सभासद, ठेवीदार व ग्राहकांना लक्षात राहिल असा घडवला. एखाद्या संस्थेने 75 वर्षे चांगल्यात चांगली सुविधा देणे कठीण आहे. पण सहकार आजही महाराष्ट्रात सशक्त असून त्याला सकारात्मक मदत म्हणून शासनाने आयकरातून मुक्ताता दिली पाहिजे, असे प्रतिपादन माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांनी येथे केले.

उपस्थित मान्यरांच्याहस्ते लाभार्थ्यांना लाभांश वितरण
यावेळी माजी चेअरमन रमणलाल गुजराथी, व्हा.चेअरमन प्रवीण गुजराथी, उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, संचालक सुनील जैन, नेमीचंद जैन, अ‍ॅड.रवींद्र जैन, अशोक गुजराथी, डॉ.नरेंद्र शिरसाठ, मोरेश्वर देसाई, राजश्री गुजराथी, अशोक अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष जीवन चौधरी, प्रा.शामभाई गुजराथी,नगरसेवक भुपेंद्र गुजराथी, आशिष गुजराथी, नितीन गुजराथी, स्वागत चेअरमन चंद्रहास गुजराथी, राजश्री गुजराथी, व्हा.चेअरमन प्रवीण गुजराथी, सुनील जैन, मोरेश्वर देसाई, सुभाष गुजराथी, डॉ.नरेंद्र शिरसाठ यांनी केला.

सन 2015/16 लाभांश सुचनापत्र प्रा.अरुणभाई गुजराथी व मान्यवरांच्याहस्ते नगराध्यक्ष मनीषा चौधरी, गोपाळ पाटील (नागलवाडी), अनिल अग्रवाल, फयाजोद्दीन रफीयोद्दीन,हर्षा गुजराथी, विरचंद जैन, श्रीकांत देसाई, सुरेश देशमुख, चंद्रकांत गुजराथी, कल्पना गुजराथी, प्रभाकर सोनार, अशोक गुप्ता (शिरपूर) या सभासदांना वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गोविंद गुजराथी व जनरल मॅनेजर किरण गुजराथी यांनी केले. आभार व्हा.चेअरमन प्रवीण गुजराथी यांनी मानले.

बॅक कर्मचार्‍यांचेही केले कौतूक
चोपडा पीपल्स बॅकेच्या अमृत महोत्सवनिमित्ताने आयोजित प्रातिनिधीक लाभांश वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन प्रा.गुजराथी बोलत होते. पुढे म्हणाले की, शहराबाहेर शाखा नसताना सुमारे गत आर्थिक वर्षात सुमारे 53 लाख झाला.यंदाच्या वर्षात बॅकेने शेअर खरेदी विक्रीत एक कोटी पेक्षा जास्त नफा मिळविला आहे. बँक लवकरच एटीएमची सुविधा लवकरच देणार असून एक्सीस बँकेशी करार करीत असल्याचे सांगितले. अमृत महोत्सवानिमित्त लाभांश म्हणून 40 ग्रॅम चांदीची वाटी भेट देणार असून 11 जूनला होणार कार्यक्रम होईल. सतत तीन दिवस कार्यक्रम होणार असल्याची माहिती गुजराथी यांनी दिली. नोटबंदी काळात बॅक कर्मचार्‍यांनी उत्तम व पारदर्शक सेवा दिल्याने ते कौतुकास पात्र आहेत.