जळगाव। 1 रोजी कृषि दिनानिमित्त जळगाव येथील कुंभार खोरी या वन क्षेत्रात सहकार राज्य मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी वनअधिकारी आदर्श रेड्डी यांच्या कडून जिल्ह्यातील वृक्षारोण व सवर्धना बाबत माहिती जाणून घेतली. यावेळी उपवनसंवरक्षक आदर्श रेड्डी सहाय्यक उपवनसंरक्षक एस.एस.रनाळकर, एम.जी.पाटील, सी.आर.पाटील, झेडपी सदस्य पवन सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख नाना सोनवणे आदी उपस्थित होते.