VIDEO: सहकाऱ्याचे अस्थी विसर्जन अन् मंत्री जयंत पाटीलांना अश्रू अनावर

0

सांगली: आपल्या सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जनाच्या कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील हे चांगलेच भावूक झालेचे दिसून आले, त्यांना बोलताना अश्रूही अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज रविवारी आपल्या सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जन कार्यक्रमात गेले होते. यावेळी जवळच्या लोकांचे अकाली निधन झाल्यामुळे जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांना गहिवरूनही आले.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम आज झाला. जगदीश पाटील यांच्या कार्याविषयी बोलत असतानाच अचानक जयंत पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि काही काळासाठी जयंत पाटील स्तब्ध झाले. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी वैचारिक बांधिलकी असणारे अनेक लोक मला लाभले. या लोकांच्या ताकदीनेच आज मी इथपर्यंत आलो आहे. मात्र तीच लोकं आज माझ्या हातून निसटत आहेत याचं दुःख जयंत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवले.