सहसचिव राणे यांची ताप्ती स्कुलला भेट

0

भुसावळ। भारतीय शालेय क्रीडा सांस्कृतिक उपक्रम महासंघाचे सहसचिव निलेश राणे यांनी सोमवारी शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलला भेट दिली. या भेटीत त्यांनी शाळेतील वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांसोबत विद्यार्थ्यांसाठी क्रीडाविषयक आयोजित होणार्‍या स्पर्धा, पुरवल्या जाणार्‍या सोयी-सुविधांची माहिती घेतली.

यांनी केले स्वागत
ताप्ती पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, प्राचार्या नीना कटलर यांनी सहसचिव राणे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या वेळी क्रीडा शिक्षक गोपाल जोनवाल उपस्थित होते.