धुळे । महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नवरंग टाकी परिसरातील कार्यालयाला ठोकण्यात आलेले टाळे तब्बल सहा तासानंतर सहायक आयुक्तांनी मध्यस्थी केल्यानंतर सोमवारी संध्याकाळी उघडण्यात आले. मनपा स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांनी सकाळी 11 वाजता हे टाळे ठोकून धरणे आंदोलन केले होते. एकवीरादेवी मंदिर रस्त्यावर महिनाभरापूर्वी खड्डे खोदून जलवाहिनी न टाकन्यासाठी अधिकार्यांनी केलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते. जलवाहिनी टाकण्यासाठी एक महिन्यापूर्वी खोदकाम करण्यात आले आह़े परंतु जलवाहिनीचे काम होत नव्हते. त्यामुळे कार्यालयाला बाहेरून कुलूप लावून 10 ते 12 अधिकारी, कर्मचार्यांंसह ठेकेदाराच्या प्रतिनिधीसही कोंडण्यात आले होते.अखेर सायंकाळी पाच वाजता मनपा सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.