सहाय्यक फौजदार भगवान सैंदाणे सेवानिवृत्त

0

चाळीसगाव । चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार भगवान वना सैंदाणे हे 31 मे 2017 रोजी पोलीस दलातील 35 वर्ष प्रदीर्घ सेवेतुन सेवानिवृत्त झाले आहे. त्यांनी जळगाव जिल्हापेठ, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन, जळगाव पोलीस मुख्यालय, रावेर पोलीस स्टेशन, मारवड पोलीस स्टेशन, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला सेवा बजावली व चाळीसगाव पोलीस ठाण्यात ते सेवानिवृत्त झाले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.