जळगाव । लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत सहाय्यक फौजदार मोजोद्दीन कादर शेख यांना राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. त्यानिमित्ताने जिल्हा सरकारी वकील कार्यालयात जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांच्याहस्ते मोजोद्दीन शेख यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा, अॅड. मोहन देशपांडे, अॅड. भारती खडसे, अॅड. नितीन देवराज, अॅड. रमाकांत सोनवणे यांच्यासह इतर सरकारी वकील बांधव उपस्थित होते.