सहाय्रक पोलिस निरीक्षक विजयसिंग गिरासे यांची सेवानिवृत्ती

0

शहादा । तालुक्यातील कार्थर्दे येथील रहिवासी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विजयसिंग वनेसिंग गिरासे हे नुकतेच 30 नोव्हेंबर रोजी पोलीस सेवेतुन सेवानिवृत्त झाले. ते धडगाव येथे कार्यरत होते. विजयसिंग गिरासे यानी 38 वर्षे धूळपाटी व नंदुरबार जिल्ह्यात पोलीस विभागात सेवा दिली. त्यापैकी 7 वर्षे सेवा त्यांनी धडगाव अतीदुर्गम भागात सेवा दिली. सेवेत त्यांनी अनेक अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले होते. धडगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असताना दोनदा पदोन्नती मिळाली . सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोपींचा शोध घेण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते 38 वर्षाचा सेवेत सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांचे चांगले सहकार्य मार्गदर्शन मिळाले असल्याचे विजयसिंग गिरासे यानी सांगितले. विजयसिंग गिरासे याचे वडिल स्व. वनेसिंग गिरासे व त्यांचे लहान बंधु देखील पोलीस सेवेत होते ही विशेष बाब आहे. पोलीस सेवेत सेवा देण्याची प्रेरणा वडिलापासुन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.