सहारनपूर घटनेप्रकरणी कारवाईची मागणी

0

भुसावळ। उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे मागासवर्गीय जनतेवर अत्याचार करण्यात आले असून याप्रकरणी संबंधित आरोपींचा शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. उत्तर प्रदेशात झालेल्या या घटनेत पोलिसांनी संबंधित आरोपींवर गुन्हा नोंदवून घेतलेला नाही. यामुळे चर्मकार समाजातील नागरिकांवर भितीचे सावट निर्माण झाले आहे. यासंदर्भात येथील मुख्यमंत्र्यांनीदेखील स्वतःहून लक्ष देवून या प्रकरणातील गुन्हेगारांवर कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी भारिपतर्फे करण्यात आली आहे.

निवेदन देताना यांची होती उपस्थिती
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, सतिष नरवाडे, कैलास नरवाडे, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश इखारे, अश्‍विन नरवाडे, गौतम हिवराळे, निनाजी नरवाडे, निलेश इखारे, उमेश आराक, भिमराव इंगळे, सागर खंडेराव, शिवाजीराव टेंभुर्णीकर, सतिश सुरवाडे यांच्या स्वाक्षर्‍या आहे.