सहाव्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा जळगावात मृत्यू

Death of laborer in Jalgaon: Crime against contractor जळगाव : जळगावातील मेहरुण तलाव परीसरात बांधकामाच्या साईटवर सहाव्या मजल्यावर स्लॅब भरण्यासाठी गेलेल्या मजुराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लिफ्टचा पाईप तुटून ता डोक्यात पडलयाने प्रथमेश संतोष वाघ (20, रा.खेडी खुर्द) या मजुराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी मेहरुण तलाव परीसरात घडली तसेच अन्य मजूर दीपक जयप्रकाश पाटील या घटनेत जखमी झाला आहे. या प्रकरणी बांधकाम ठेकेदार भागवत सोनवणे, शिवा सोनवणे यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गंजलेल्या पाईपांची लिप्ट बेतली जीवावर
शरातील मेहरुण तलाव परीसरात अनिश शहा यांच्या सहा मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या साईटवर प्रथमेश वाघ याच्यासह इतर मजूर काम करीत होते. सहाव्या मजल्यावरील स्लॅब भरायचा असल्याने खालच्या मजल्यावरुन सहाव्या मजल्यापयर्ंत बांधकामाचे साहित्य चढविण्यासाठी सोमवारी मजूरांनी लाकडी बांबू व लोखंडी गंजलेल्या पाईपांच्या सहाय्याने लिफ्ट बनविली. तयार करण्यात आलेली लिफ्ट कमकुवत असून त्यामुळे काहीही घटना घडून धोका निर्माण होवू शकतो. याबाबत काम करणार्‍या मजूरांनी ठेकेदाराला पुर्वकल्पना दिली होती मात्र ठेकेदार भागवत सोनवणे व शिवा सोनवणे यानी त्यांनी सांगण्याकडे दुर्लक्ष केल्याने मजुराचा मृत्यू ओढवला.

ठेकेदारांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
ठेकेदारच्या दुर्लक्षामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी राकेश सखदेव बाविस्कर (रा.खेडी खुर्द) या तरुणाच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात ठेकेदार भागवत सोनवणे, शिवा सोनवणे यांच्यासह बांधकाम ठेकेदाराविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे व हवालदार सचिन मुंडे तपास करीत आहे.