पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शनिवार पेठेतील शाळेच्या सहाशे एक्याऐंशी विद्यार्थ्यांना शनिवारी गोवर आणि रुबेला या आजारांवर प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. त्याबरोबरच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देण्यात आली. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले यांचा मुलगा आदित्य याचेही लसीकरण करण्यात आले. शाळेमध्ये झालेल्या या मोहीमेच्या वेळी आरोग्य प्रमुख डॉ.रामचंद्र हंकारे, डॉ.अमित शहा, शाळेच्या प्राचार्या दीपाली ठकार आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा
पुणे शहराला गोवर आणि रुबेला या आजारांपासून मुक्त करण्यासाठी महापालिकेने २७ नोव्हेंबरपासून पाच आठवड्यांची लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. शाळांमध्ये ही मोहीम चालू असून महिपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्येही लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.