सहा कोटीच्या कामांना मंजुरी; स्थायी समिती सभेत निर्णय

0

पिंपरी : चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणार्‍या सुमारे एक कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली. जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी मनपा कार्यक्षेत्रामधील आकुर्डी येथे मुक्कमी असते वारकर्‍यांना एक तातडीची व विशेष बाब म्हणून मोफत वैदयकीय सुविधा देण्यास येणार्‍या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

मानधनावर स्ययंसेवक नेमणार
शहरातील नागरीकांच्या सहभागाने शहराची नविन ओळख निर्माण करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रामार्फत दोन हजार फॉर्म भरुन घेण्यासाठी प्रत्येक फॉर्मला 15 रुपये याप्रमाणे संबधिताना मानधन अदा करणेस येणार्‍या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाचे विदयुत विभागासाठी 100 व्हॅट एलईडी स्ट्रीट लाईट फिटींग साहित्य खरेदीकामी येणार्‍या सुमारे 35 लाख 37 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

नवी जलवाहिनी, पेव्हींग ब्लॉक
मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रभाग क्र 43 मध्ये जुन्या पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकणे या कामासाठी येणार्‍या सुमारे 25 लाख 26 हजार रुपयांच्या खर्चास, मनपाच्या स्थापत्य विभागाकडील प्रभाग क्र 10 तुळजाईवस्ती व विवेकनगर मध्यभागात नवीन पेव्हींग ब्लॉक बसवण्यासाठी सुमारे 28 लाख तीन हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.