नंदुरबार। शासन जेव्हा सामान्य जनतेसाठी काम करते, तेव्हा काय होवू शकते याचे आदर्श उदाहरण म्हणजे नंदुरबार येथील सातपुडा महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून पाहावयास मिळाले आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शहरातील मोदी मैदानावर आजपासून तीन दिवसीय महाआरोग्य शिबिरास सुरवात झाली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. अर्ध्या दिवसात तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक रुग्णांच्या नोंदणीचा उच्चांक या शिबिरातून झाला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी महाआरोग्य शिबिराची सुरवात जळगावपासून केली. तेव्हापासून नाशिक, बीड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार येथे सुरू झालेले आरोग्य शिबिर आगळे- वेगळे म्हटले पाहिजे. शिबिराचे नियोजन व मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच आहे. या शिबिरामुळे आरोग्य तपासणीचा नवा ‘पॅटर्न’ सुरू झाला आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. नंदुरबार येथील आरोग्य शिबिर खर्या अर्थाने ऐतिहासिक ठरणारे आहे.
बोधचिन्हाचे अनावरण
यावेळी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पंडित दीनदयाळ आरोग्य योजनेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महसूल व वनविभागाच्या विविध विकास योजनांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याशिवाय नंदुरबार येथे नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सर्किट हाऊसच्या कोनशिलेचे अनावरण करुन उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पद्मश्री डॉ. रमण देशपांडे, डॉ. शेखर भोजराज, डॉ. जगदीश कुलकर्णी, डॉ. पारेख, डॉ. अजय चंदनवाले, डॉ. मुराद लाला, डॉ. जॉय चक्रवर्ती, डॉ. सुधीर पिल्लई, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. संजय उपाध्याय, डॉ. अजय चौरसिया, डॉ. अजय भांडारकर, डॉ. राज गजभिये, डॉ. रोहित भंडारे, डॉ. हर्षद खान, रामेश्वर नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
हृदयरोग, कर्करोगाच्या रुग्णांसाठी शिबिरे वरदान
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले, उत्तम आरोग्य वरदान आहे. हृदयरोग, कर्करोगाच्या रुग्णांसाठी अशाप्रकारची शिबिरे वरदान ठरणारी आहेत. या शिबिरात निष्णात डॉक्टर वैद्यकीय सेवा देत आहेत त्यांचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा. पालकमंत्री श्री. रावल म्हणाले, नंदुरबार शहरात अभूतपूर्व असा मेळावा भरविण्यात आला आहे. त्यासाठी पाड्या- पाड्यापर्यंत स्वयंसेवक पोहोचले. त्यांनी रुग्णांची नोंदणी केली. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगले सहकार्य केले आहे. नंदुरबार जिल्ह्याची गरज लक्षात घेवून आगामी काळात प्रत्येक योजनेत नंदुरबारचा समावेश करुन या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवून आणला जाईल. या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही मंत्री श्री. रावल म्हणाले.
हृदयरोग, कर्करोगाच्या रुग्णांसाठी शिबिरे वरदान
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले, उत्तम आरोग्य वरदान आहे. हृदयरोग, कर्करोगाच्या रुग्णांसाठी अशाप्रकारची शिबिरे वरदान ठरणारी आहेत. या शिबिरात निष्णात डॉक्टर वैद्यकीय सेवा देत आहेत त्यांचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा. पालकमंत्री श्री. रावल म्हणाले, नंदुरबार शहरात अभूतपूर्व असा मेळावा भरविण्यात आला आहे. त्यासाठी पाड्या- पाड्यापर्यंत स्वयंसेवक पोहोचले. त्यांनी रुग्णांची नोंदणी केली. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगले सहकार्य केले आहे. नंदुरबार जिल्ह्याची गरज लक्षात घेवून आगामी काळात प्रत्येक योजनेत नंदुरबारचा समावेश करुन या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवून आणला जाईल. या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही मंत्री श्री. रावल म्हणाले.
नऊ डोममध्ये रूग्णांची तपासणी रुग्ण तपासणीचे नऊ डोम 20 प्रमुख आजारांबरोबरच आयुष मधील उपचार येथे असल्याने रुग्णांना आपल्या गरजेनुसार उपचार घेण्यासाठी त्या- त्या डोममध्ये गर्दी करत होते. आयुष साठी असलेल्या डोममध्ये आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आदी वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित राहून रुग्णांना उपचार करत होते. यासाठी कर्मवीर व्यं. ता. रणधीर आयुर्वेद महाविद्यालय शिरपूर (धुळे), श्रीमती के. बी. आबड होमिओपॅथिक महाविद्यालय आणि आर. डी. चोरडिया हॉस्पिटल चांदवड (नाशिक) येथील डॉक्टर उपस्थित होते. प्रत्येक डोम मध्ये 14 ते 18 रुग्ण तपासणी कक्ष निर्माण केलेले असल्याने प्रामुख्याने ग्रंथी विकार, मेंदुविकार, मनोविकारर, बीएमडी (हाडाचा ठिसूळपणा) श्वसन विकार, हृदय विकार, कर्करोग त्वचाविकार, नेत्ररोग, आदी शस्त्रक्रियासाठीच्या विविध आजारांसाठीच्या तपासणी करण्यात येत होत्या. यासाठी मुंबईमधील टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट, केईएम, जे. जे. हॉस्पिटल, हिंदुजा, लीलावती, पुणे येथील दीनानाथ मंगेशकर, जहांगीर आदीसह नाशिक, धुळे, औरंगाबाद, जळगाव येथील नामांकित डॉक्टर, विविध जिल्हा रुग्णालयांची वैद्यकिय तज्ज्ञांचे पथक हजर राहून उपचार करत होते.
जैन इरिगशनतर्फे स्प्रीकर्लद्वारे वातावरण थंड
मुख्य तपासणी, रुग्ण नोंदणी, औषध वितरण, शस्त्रक्रिया नोंद, रक्तदान या वैद्यकीय सेवांबरोबरच रुग्ण आणि त्यांच्या सोबतच्या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जैन इरिगेशनच्या साहाय्याने तयार केलेल्या स्प्रीकलर्संमुळे साधारण 25 मिनिटे ते अर्धा तासाच्या ठराविक वेळेच्या अंतराने पाण्याचा फवारणीमुळे वातावरण थंड होत होते. नवापूर येथून आलेल्या दगा गावीत यांनी यामुळे थकवा येत नसल्याचे सांगून ही सोय खूपच चांगली असल्याचे व त्यामुळे तपासणी साठी नंबर लागायला वेळ लागत असला, तरी त्रास वाटत नसल्याचे सांगितले. रुग्णांना शिबिरादरम्यान सुविधा देण्यासाठी पाणी, भोजन बरोबरच मदत कक्ष, आपत्कालीन मदत यामध्ये स्ट्रेचर, व्हीलचेअर आदी मदत उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था देखील निर्माण करण्यात आली.
जिल्ह्यातील कानाकोपर्यातून रूग्ण दाखल
महाआरोग्य शिबिरासाठी जिल्ह्याच्या कानाकोपर्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील महिला पुरुष , वृध्द, लहाने मुले , युवक संख्येने आल्याने मोठी गर्दी दिसून आली. महाशिबिर असलेल्या मोदी मैदानावर आरोग्य तपासणीसाठी उभारण्यात आलेल्या विविध आकाराचे भव्य शामियाने, मंडप आणि डोम लोकांच्या गर्दीने फुलून गेल्याने कुंभमेळ्याचे स्वरुप जाणवत होते. शिबिरासाठी रुग्णांच्या तपासणीसाठी पुणे, मुंबईसह अनेक जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर मोठ्या संख्येने दाखल झाल्याने अनेक दुर्धर व किचकट आजारांची पाहाणी यासाठी करण्यात येत होती.
व्यापारी संघातर्फे भोजन
भोजन सुविधा जिल्हाच्या दूरदूरच्या भागातून शिबीरासाठी आलेल्या रुग्ण व नातेवाईकांसाठी धुळे, जळगाव व नंदुरबार येथील व्यापारी संघ व व्यावसायिकांच्या मदतीमधून केळी व खिचडीच्या आहाराची व्यवस्था, पाणी पाऊच व बिस्कीट पुडे यांची व्यवस्था केलेली होती. यासाठी 35 काउंटर्स व 225 पेक्षा जास्त स्वयंसेवक मदत करतांना दिसत होते. येणार्या प्रत्येकास पाणी, केळी , खिचडी देण्यात येत होती. या तयारीवर मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल लक्ष ठेवून होते.