जळगाव । सुरक्षा मंडळातुन कमी केलेल्या सुरक्षा रक्षकांची नावे त्वरीत मंडळात नोंदविण्यात यावी, सुरक्षा रक्षक म्हणून काम करतांनाचा ईपीएफ मिळावा, बेकायदा ठेवण्यात आलेल्या मेस्को एजन्सीकडून मंडळाचे सुरक्षा रक्षक नेमा आदी मागण्यासाठी अखिल स्वराज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटनेतर्फे सहा दिवसांपासून पाळधी येथे उपोषण सुरु होते. अखेर या उपोषणांची सांगता करण्यात आली आहे. 27 एप्रिल पासून उपोषण सुरु होते. सुरक्षा मंडळाचे अधिकारी सी.बी.पाटील यांच्याशी संघटनेचे अध्यक्ष सोमा कढरे, जिल्हाध्यक्ष गौतम पारधे, सतिष पाटील, जिजाबराव भालेराव, अनिल तायडे, भुषण माळी, सतिष नन्नवरे, वसंत माळी यांनी चर्चा केली. त्यानंतर उपोषणांची सांगता करण्यात आली.