सहा महीने उलटल्यानंरही माळी परिवार न्यायाच्या प्रतिक्षेत

0

जैताने । साक्री तालुक्यातील जैताने येथील सामाजिक कार्यकर्ते माळी महासंघाचे सदस्य तसेच समता परिषदचे उपाध्यक्ष गोकुळ रतन माळी यांची 28 जानेवारी 2017 रोजी रात्री साक्री येथे निघृन हत्या झाली होती. हत्या होऊन सहा महिन्याच्या वर कालावधी लोटला तरी देखील गोकुळ माळी यांच्या परिवाराला न्याय मिळालेला नाही, घटना घडल्या रात्रिच स्थानिक पोलीस प्रशासनाने संशइताना ताब्यात घेऊन कार्यवाही केली होती मात्र खरे आरोपी तेच होते का अन्य कुणाचा हात या मागे होता याचा पूर्ण तपास अजुन बाकीच आहे.

सीबीआई चौकशीची मागणी
गोकुळ माळी हे सामाजिक कार्यकर्ते होते म्हणून त्यांचा चाहता वर्ग देखील गावात मोठ्या प्रमाणात असल्याने निजामपुर व जैताने गांव व बाजारपेठ एक दिवसीय बंद ठेऊन माळी परिवारासह गवकर्यांनी सीबीआई चौकशी ची मागणी केली होती स्थानीक पोलीस स्टेशन चे ए पी आय पटले साहेब यांना त्यावेळी निवेदन देऊन हि मागणी झाली होती मात्र तदनंतर कुठल्याही गटाकड़ून अथवा समुदायांकडून पाठ पुरावा न झाल्याने ही मागणी अपूर्णच राहिली आरोपीना जामीन- घटना घडल्या नंतर ज्या अरोपीना साक्री पोलिस प्रशासनाने अटक केली होती त्यांना आता जामीन मिळाली आहे म्हणून माळी परिवार त्याबद्दल दुःख मनात बाळगुण आहेत खर्‍या मारेकर्यांचा तपास करून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे जेणेकरून मारेकर्‍यांना जरब बसेल व जाती समाजात अश्या घटना पुन्हा घणार नाहीत. अर्थातच माळी परिवारने पहिल्या पासुनच पोलिस यंत्रनेवर आमचा पूर्ण विश्वास आहे अशी भूमिका घेतली होती म्हणून पोलीस प्रशासनाने देखील घटनेचे गांभीर्य ओळखून योग्य गतीने तपास फिरवला पाहिजे एवढीच मागणी जन सामान्य लोकांसह माळी परिवाराची आहे.