* स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई;
* जिल्हा पोलीस हद्दीतील पाच गुन्ह्याचा उलगडा
जळगाव – गेल्या दोन वर्षात जळगाव, अमळनेर या भागातील मोटारसायकली चोरणारा गुप्त माहितीनुसार सापळा रचून एकाला अटक केली असून त्यांच्याजवळ सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहे. ही कामगीरी स्थानिक गुन्हे शाखेचे विभागाची असून आरोपीस जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. जावेद खान हबीब खान रा. धानोरा मोहाल्ला अडावद ता.चोपडा असे आरोपीचे नाव आहे.
जिल्हा पेठ पोलीस स्थानकात दाखल होता गुन्हा
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, संजय प्रभाकर धनगर (वय-43) रा. सुनंदीनी पार्क जुना खेडी रोड यांनी 22 डिसेंबर 2016 रोजी सायंकाळी 8.00 ते 8.30 वाजेच्या सुमारास शहरातील अंबेडकर मार्केटजवळ कामानिमित्त मोटारसायकल (एमएच 19, बीके 0183) ने गेले. त्यांनी अंबेडकर मार्केटजवळून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत संजय धनगर यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात जिल्हा पेठ पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस अज्ञात चोरट्याच्या तपासात असतांना चोरटा अडावद येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली.
पथकातील कर्मचाऱ्यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधिक्षक दत्ता शिंदे, अप्पर पोलीस अधिक्षक लोहीत मतानी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल कुराडे यांनी पथक तयार करून आरोपीस ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. या पथका सपोनि सागर शिंपी, पोहेकॉ नारायण पाटील, बापू पाटील, योगेश पाटील, दिपक पाटील, मनोज दुसाने, सुशिल पाटील, विजय पाटील, विनोद पाटील, सचिन महाजन, अरूण राजपूत, नुरोद्दिन शेख, रामचंद्र बोरसे, पो.ना.प्रविण हिवराळे, दिपक छ.पाटील यांचे पथक तयार केले.
सापळा रचून घेतले ताब्यात
अडावद येथे पथकाने सापळा रचून बसस्थानकाच्या मागे असलेल्या धानोरा मोहल्ला येथे आरोपी जावेद खान हबीब खान रा. धानोरा मोहल्ला, अडावद ता.चोपडा यांची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशी केली असता मोटारसायकल चोरीचा गुन्हा कबुल करत त्याच्या ताब्यातील दीड हजार रूपये किंमतीच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आले.
याची अधिक चौकशी केली
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या मोटारसायकली ह्या शहरातील जिल्हा पेठ पोलीस हद्दीतील घडलेल्या घटना असल्याचे समोर आले आहे. यात सहा पैकी पाच गुन्हे जिल्हा पेठ पोलीसात तर एक अमळनेर पोलीसात मोटारसायकल चोरल्याची नोंद करण्यात आल्या आहेत.