सहा लाखांची बॅगचोरी ; दोघे संशयीत जाळ्यात

0

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

जळगाव- पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील येथील संजय विष्णू वाणी या शेतकर्‍याच्या हातातून पाच लाख 75 हजार 300 रुपये किंमतीची रोकड लांबवणार्‍या दोघा आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. 1 रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास संशयीतांनी वाणी यांच्या हातातील बॅग धूम स्टाईल लांबवली होती. या प्रकरणी आनंदा शांताराम हटकर (40, रामेश्‍वर कॉलनी, जळगाव) यास अटक करून त्याच्याकडून 50 हजार रुपये हस्तगत केले तर दुसरा आरोपी रितेश उर्फ चिच्या किसन शिंदे (18, तुळशिनगर, जळगाव) यास कल्याण येथून अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून एक लाख 59 हजार रुपये जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोह देशमुख, रवींद्र पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, अनिल इंगळे, विनोद पाटील, संजय सपकाळे, रा.का.पाटील, रामचंद्र बोरसे, रवींद्र चौधरी, युनूस शेख, संतोष मायकल, दीपक पाटील, दत्तात्रय बडगुजर, सतीश हाळनोर, चंद्रकांत पाटील, महेश पाटील, दिनेश बडगुजर, अशरफ शेख, प्रकाश महाजन, गफूर तडवी आदींनी केली.