सहा हजारांची लाच भोवली : नंदुरबार शहरातील लाचखोर हवालदार एसीबीच्या जाळ्यात

नंदुरबार : गुन्ह्यात मदत करण्यासाठी 12 हजारांची लाच मागून तडजोडीअंती सहा हजारांची लाच स्वीकारणार्‍या नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यातील हवालदाराला नंदुरबार एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केली. गुरुवारी सायंकाळी हा सापळा यशस्वी झाला. सुनील अर्जुन अहिरे (57) असे अटकेतील हवालदाराचे नाव आहे.

सहा हजारांची लाच भोवली
51 वर्षीय तक्रारदार व इतर तीन इसम यांच्या विरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं.91/2022, भा.द.वि. कलम 160 प्रमाणे 11 मार्च 2022 रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्याकामी तक्रारदार यांच्याकडून 12 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती सहा हजारांची लाच स्वीकारताना आरोपी हवालदार सुनील अहिरे यांना अटक करण्यात आली. नंदुरबार पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक समाधान वाघ, विलास पाटील, अमोल मराठे, ज्योती पाटील, विजय ठाकरे, मनोज अहिरे, संदीप नावाडेकर व देवराम गावीत आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.