सहा हजारांची लाच भोवली : पाचोर्‍यातील वैद्यमापन शास्त्र विभागाच्या निरीक्षकाला एसीबीकडून अटक

Inspectors of the Department of Medicine in Pachora in the net of Jalgaon ACB जळगाव : पेट्रोल पंपावरील नोझल मशिनचे स्टॅम्पिंग करून स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात सहा हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या पाचोरा शहरातील वैद्यमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक विवेक सोनु झरेकर (54, रा.पुनगाव रोड, पाचोरा) यांना मंगळवारी दुपारी जळगाव एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हॉटेलवर स्वीकारली लाच
पहूर येथील 49 वर्षीय तक्रारदार यांचा जय बालाजी नावाचा पेट्रोल पंप आहे. या पंपावरील चार झोनल मशीला स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी दिड हजारांप्रमाणे सहा हजारांची लाच झरेकर यांनी मंगळवारी मागितली होती. याबाबत तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. पहूर-जळगाव रोडवरील हॉटेल अजिंक्य लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक एस.के.बच्छाव, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, ईश्वर धनगर, राकेश दुसाने सचिन चाटे आदींच्या पथकाने यशस्वी केला.