वडगाव : वडगाव मावळचा ग्रामसेवक दिपक शिरसाट याला सहा हजारांची लाच घेताना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. मंगळवारी) दुपारी वडगाव मावळ पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात करण्यात आली. दीपक श्रीराम शिरसाठ (वय 49, रा. वडगाव मावळ) असे त्याचे नाव आहे.
मंजुर अनुदान देण्यासाठी…
सरकारकडून 14 व्या वित्त आयोगापोटी तालमीसाठी मंजूर झालेले 8 लाख 68 हजार 480 रुपयांचे अनुदान देण्यासाठी शिरसाठ याने वडगाव येथील तालमीच्या सचिवाकडे 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. या आधी 14 हजार रुपये शिरसाठ याला दिले होते. उर्वरीत रक्कम 6 हजार देणे बाकी होते. दरम्यान तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली असताना दुपारी पंचायत समितीच्या कार्यालयात हा सापळा रचून शिरसाठ याला अटक कऱण्यात आले. शिरसाठ याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.