आळंदी : सह्याद्री इंटरनॅशनल स्कुलचे उद्घाटन देहू फाटा येथे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे हस्ते उत्साहात करण्यात आले.
यावेळी आमदार महेश लांडगे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, नगरसेवक गणेश भेगडे, संयोजक गणेश गरुड, सुरेश लोखंडे, प्रदीप गरुड, सचिन मेथे, बाबाजी काळे, तपनेश्वर संस्थेचे अध्यक्ष बाबुराव मुळे, दिव्यांग कल्याण केंद्राचे कार्याध्यक्ष मुरलीधर कचरे, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, गटनेते पांडुरंग वहिले, पांडुरंग ठाकूर, भागवत आवटे, संचालक विलास बोर्हाडे, वासुदेव भागवत, मुख्याध्यापिका प्रियांका लांडे उपस्थित होते.
स्वच्छतेसाठीचा उपक्रम स्तुत्य
यावेळी राज्यमंत्री कांबळे म्हणाले की, या प्रशालेत शैक्षणिक वातावरण निर्मितीच्या उपक्रमाने आनंद वाटला. स्वच्छता अभियानवर आधारित समाज प्रबोधन करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याने या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. प्रशालेस त्याने शुभेच्छा दिल्या. अभिनव एज्युकेशन सोसायटीच्यावतीने तिसर्या शाखेचे उद्घाटन झाले. गणेश गरुड यांचेसह पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.