सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे उद्या व्याख्यानाचे आयोजन

0

चाळीसगाव । इतिहासाच्या पाऊलखुणा या व्याख्यानांच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार 19 मार्च 2017 रोजी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले असून यात इतिहास संशोधक व इतिहास अभ्यासक असलेल्या वक्त्यांचे एकाच दिवशी सलग पाच व्याख्याने आयोजित करून चाळीसगावकरांना इतिहास अभ्यासण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्गसंवर्धन व इतिहासाची जपणूक करणार्‍या संघटने मार्फत चाळीसगाव शहरातील राजपूत मंगल कार्यालयात इतिहासाचे अभ्यासक डॉ. केदार फाळके पीएचडी पुणे यांचे ‘छत्रपती शिवराय काल, आज व उद्या’ या विषयावर, महेश बुलाख – इतिहास अभ्यासक पुणे, यांचे शिवकालीन कृषी व्यवस्था या विषयावर व्याख्यान होणार आहे.

उपस्थित राहण्याचे प्रतिष्ठानतर्फे आवाहन
श्रमिक गोजमगुंडे संस्थापक अध्यक्ष सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र यांचे ‘किल्ल्यांचे स्थापत्य विशेष’ या विषयावर तर डॉ प्रमोद बोराडे शिवकालीन शस्त्र व दुर्ग अभ्यासक यांचे शिवकालीन दुर्ग व्यवस्था या विषयावर तर इतिहासाचे गाठे अभ्यासक अ‍ॅड. रवींद्र यादव यांचे अपरिचित शिवराय या विषयावर व्याख्यान होणार आहे. वरील पाचही वक्ते इतिहास संशोधन व इतिहासाचा अभ्यास करून पुराव्यानिशी आपल्या व्याख्यानातून इतिहासाच्या पाऊलखुणा श्रोत्यांसमोर मांडणार असून चाळीसगाव शहरात प्रथमच एका दिवसात 5 वक्त्यांचा व्याख्यानाचा प्रयोग करण्यात येत असून ऐतिहासिक चाळीसगाव नगरीत ऐतिहासिक जाणकार श्रोत्यांनी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख तथा कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक दिलीप घोरपडे, जिल्हा प्रमुख शुभम चव्हाण आदींनी केले आहे.