चाळीसगाव । सरसेनापती संताजी घोरपडे पुण्यतिथीनिमित्त 18 जुन रोजी सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या वतीने किल्ले सुतोंडा (नायगाव) ता.सोयगाव जि.संभाजीनगर येथे दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य यांनी सकाळी 8:30 वाजेपर्यंत शहरातील तहसिल कार्यालयाजवळ असलेल्या हॉटेल आर्योपहार येथे जमणार असुन येथून पुढे किल्ले च्या पायथ्याशी सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचून 10:10 वाजता गड चढण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
11.10 वाजता गडावर पोहोचल्यानंतर गडपूजन करून नरवीर संताजी घोरपडे याच्या प्रतीमेचे पुजन करण्यात येणार आहे. 11.35 वाजे पर्यंत नियोजित कामच्या ठिकाणी जावुन गडावरील कचरा गोळा करण्यात येणार आहे. दुपारी जेवण आटोपल्यानंतर दुर्गदर्शन करण्यात येणार आहे. सदरील मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.