सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे दुर्गसंवर्धन मोहीम होणार

0

चाळीसगाव । कन्नड तालुक्यातील लौंझा किल्यावर दुर्गदर्शन आणि दुर्गसंवर्धन मोहीम राबविणार असून वनविभाग व सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. किल्ले लौंझा येथे जाण्यासाठी दुर्गप्रेमी व सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकत्यांनी रविवार 16 जुलै 2017 सकाळी 8:30 वाजेपर्यंत चाळीसगाव येथील तहसील कार्यालय जवळील आर्यापोहार हॉटेलजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन केले. नियोजित कामाच्या ठिकाणी गडावरील कचरा गोळा करून त्याचे विल्हेवाट लावून दुर्गदर्शन करण्यात येणार आहे. मोहिमेत सहभागी होण्यासाठी दिलीप घोरपडे, शुभम चव्हाण, विवेक रणदिवे, अजय जोशी, किरण घोरपडे, शरद पाटील तसेच सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.