सांख्यिकीचे जनक महालनोबिस यांचे विचार अनुकरणीय

0

धुळे । सांख्यिकीचे जनक प्रशांतचंद्र महालनोबिस यांचा जन्म दिवस हा साख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. अशा महान व्यक्तीची जयंती व पुण्यतिथी साजरी करतानाच त्यांचे अनुकरणीय विचार अमलात आणावेत, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी एम.आर.वाडेकर यांनी आज केले. ते जिल्हा सांख्यिकी कार्यालयात सांख्यिकी दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मानव विकासचे नियोजन अधिकारी आर.ए.पवार, सहाय्यक नियोजन अधिकारी बी.सी.चौरे, श्री. तोरवणे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी ए.बी.चौधरी आदि उपस्थित होते. साख्यिंकीच्या माध्यमातून आर्थिक पहाणी अहवाल, अर्थसंकल्प, जन्म-मृत्यू दर, कर्मचारी गणना असे विविध पैलू पहावयास मिळत असल्याने सांख्यिकी हा प्रशासनाबरोबरच लोकशाहीत सांख्यिकीचा मोठ्या प्रमाणात वापर होतांना दिसून येत असल्याचेही श्री. वाडेकर यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हा सांख्यिकी अधिकारी ए.बी.चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. नियोजन अधिकारी श्री.तोरवणे यांनी महालनोबीस यांच्या कार्याची माहिती दिली. सांख्यिकी सहाय्यक  सवीता पवार यांनी महालनोबीस यांचे जिवन चरित्र उलगडून सांगितले तर प्रशासनात सांख्यिकीचे महत्व काय याबाबत गोपाळ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन प्रकाश लोथे यांनी तर आभार दीपक पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी रोहित जाधव, कैलास पाटील, मनोज मोरे, सानप, घनबहादूर, राठोड, श्रीमती कावने, दिलीप पाटील, पाठक, श्री. साबळे, कुकडकर व जगताप यांनी कामकाज पाहिले.