सांगली: सांगलीची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पुरामुळे अनेक जण बेघर झाले आहे. हजारो कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मात्र प्रशासनाकडून उशिरा मदत मिळाल्याचे सांगत सांगलीकरांनी संताप व्यक्त केला. सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख हे आज सांगलीला पोहोचले, यावेळी नागरिकांनी त्यांना घेराव घातले. प्रशासनाकडून मदत उशिरा का मिळाली याचा जाब नागरिकांनी त्यांना विचारले.