सांगलीत राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या; चार दिवसात दोन नेत्यांची हत्या !

0

सांगली: सांगलीत गेल्या चार दिवसात दोन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. आज शुक्रवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मनोहर पाटील असे राष्ट्रवादीच्या नेत्याचे नाव असून ते माजी पंचायत समिती सभापती आहे. धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घृण हत्या करण्यात आली. कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथे अज्ञात हल्लेखोरांकडून हा हल्ला करण्यात आला. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. चार दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंदराव पाटील यांची हत्या झाली होती. यांच्या डोक्यात वार करून हल्लोखोरांनी पळ काढला होता. हे प्रकरण ताजं असतानाच अजून एक हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.