सांगवडे ग्रामस्थांतर्फे गुरुजनांचा सन्मान

0
शिरगाव:ग्रामपंचायत सांगवडे व ग्रामस्थांतर्फे शिक्षक दिनानिमित्त सर्व गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम सांगवडे येथील जी.प. शाळेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक श्रीधर  उतेकर, पदवीधर शिक्षक संदीप सकपाळ, अण्णासाहेब ओहोळ, स्वाती जगताप, संगीता शिरसाट आदी शिक्षक उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांतर्फे सर्व गुरुजनांना श्रीफळ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मुलांना खाऊ वाटप करण्यात आल्याची माहिती उपसरपंच अमोल मोकाशी यांनी दिली. यावेळी बोलताना मोकाशी म्हणाले की, शिक्षक हा गावाबरोबर देशाच्या विकासात हातभार लावणारा घटक आहे आणि येणारी पिढी ही कशी घडवायची हे त्यांच्यावरच अवलंबून असते. त्यामुळे त्यांच्या उपकरातून उतराई होणे कोणत्याच माणसाला शक्य नाही. आज जगातील मोठी मोठी माणसे आपल्या शिक्षकांनाआदर्श मानतात. व्यक्तीच्या आयुष्याला आकार देणारा व्यक्तती म्हणजेच शिक्षक असतात. कार्यक्रमासाठी उपसरपंच मोकाशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदा राक्षे, सदस्य कविता संदीप राक्षे, भारती शरद भंडारी व माधुरी भिसे उपस्थित होते. तर कविता राक्षे यांनी चांगले शिक्षक आमच्या शाळेला लाभले आहेत त्यामुळे आम्हला आमच्या मुलांचे भविष्य चांगले घडणार आहे. याविषयी कोणतीच खंत नाही. या शाळेतील शिक्षक हे शाळेत आल्यावर सर्व विसरून फक्त आध्यापनाचे  कार्य निरंतर करत असतात. त्यामुळेच तर ते या सत्काराचे अधिकारी ठरले आहेत.