तर्हाडी। शिरपुर तालुक्यातील केंद्रशाळा सांगवी येथील केंद्रप्रमुख प्रकाश लोटन पवार यांचा सेवापुर्ती समारंभ उपसभापती संजय पाटील यांच्या अध्यक्षस्थक्षतेखाली झाला. यावेळी माजी नगसेवक अशोक कलाल यांच्या हस्ते त्यांचा सेवापुर्तीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सभापती राजेंद्र पाटील, शामकांत ईशी, ग.स.बँकेचे माजी चेअरमन बी.बी.पिंगळे, माजी नगराध्यक्षा संगिता देवरे, छाया इशी गटशिक्षणाधिकारी प्रकाश रणदिवे, योगेश बादल, नगरसेवक हेमंत पाटील, राजू सोनवणे, विस्तार अधिकारी आर.के.गायकवाड उपस्थित होते. सदर कार्यक्रमात पी.एल. पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
त्यांनी 34 वषार्ंच्या सेवेत आपला जास्त सेवा कालावधी आदिवासी व दुर्गम भागात केला. त्यांनी सांगवी केंद्राअंतर्गत सर्व जि.प.शाळा लोकवर्गणीतून डिजीटल केल्या व स्वच्छ व सुंदर शाळा करण्यासाठी शिक्षकांना प्रेरीत केले. यावेळी सर्व तालुक्याचे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या सूत्रसंचालन वाहिद अली सय्यद यांनी केले. आभार शरद सूर्यवंशी यांनी मानले.