सांगवीच्या ईसमाचा हतनूर कालव्यात मृत्यू

0

यावल- तालुक्यातील सांगवी खुर्द येथील ईसमाचा हतनूर कालव्यात मृतदेह आढळला. शांताराम मंगल कोळी (58, सांगवी खुर्द) असे मयताचे नाव आहे. 2 ऑक्टोबरपासून कोळी हे बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू होता. मयताचा मुलगा खबर देणार सुनील शांताराम कोळी (रा.सांगवी खुर्द) यांनी या प्रकरणी यावल पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार असलम खान करीत आहेत.