सांगवीत तरूणावर वार

0
सांगवी : विनाकारण तरूणाला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच चाकूने डोळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी दुपारी पिंपळे-सौदागर पोलीस चौकीच्या मागे घडली. सौरभ धनवटे (रा. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश माधव कांबळे (वय 20, रा. आशिर्वाद कॉलनी, रहाटणी) हा गंभीर जखमी झाला असून त्याने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सौरभने शुक्रवारी दुपारी आकाशला पिंपळे-सौदागर येथील पोलिस चौकीमागे घेऊन गेले. तेथे त्याला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. फिर्यादीने मला का मारतो, असे विचारल्यानंतर आरोपीने चाकूने त्याच्या डोळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. सांगवी पोलिस तपास करत आहेत.