यावल- तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे प्लॉटच्या खरेदी व्यवहाराचे वाईट वाटून एकास चौघांनी मारहाण करीत गंभीर दुखापत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेबुब सरदार तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील रसुल बलदार तडवी, रूकशाना रसुल तडवी, अन्सार रसुल तडवी व नजमा अन्सार तडवी (सर्व रा.सांगवी बुद्रुक) यांनी 25 एप्रिल रोजी सकाळी फिर्यादीच्या घरासमोर येऊन आम्ही खरेदी रद्द केलेला प्लॉट तू का घेतला ? असा जाब विचारत मारहाण केली. त्यात त्यांच्या हाताचे हाड मोडले गेले. यावरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अजीज शेख करीत आहे.