सांगवी : विजेच्या खांबाला कार धडकून झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना पहाटे पावणेतीन वाजता सांगवी फाटा येथे घडली. जुहुराम ओसवाल (वय 54, रा. गुलटेकडी, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठांचे नाव आहे. या प्रकरणी मोटार चालक ज्ञानेशवर रामचंद्र उंबरकर (वय 45 रा. गुरुवारपेठ, पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ओसवाल यांच्या मुलगा रोनक ओसवाल (वय 28) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चालक उंबरकर याचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार सांगवी फाट्याजवळ असलेल्या विजेच्या खांबावर जाऊन धडकली. यामध्ये ओसवाल गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. याप्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.