सांगवीत वाहतूक पोलिसांचा सन्मान

0

सांगवी : येथील ओम साई फाउंडेशन व चंद्रभागा आनंदराव भोसले प्रतिष्ठान यांच्या वतीने गणपती व बकरी ईद या उत्सवात पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था चांगल्या प्रकारे हाताळल्याबदल त्यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस उपायुक्त अशोक मोराळे व सहाय्यक पोलीस आयुक्त महादेव गावडे यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना सन्मानित करण्यात आले. सांगवी फाटा येथील पोलीस वाहतूक शाखा कार्यालयाजवळ हा कार्यक्रम पार पडला. नागरिकांच्या सहकार्यामुळेच पोलिसांना आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडता येते, असे मत याप्रसंगी उपायुक्त अशोक मोराळे यांनी व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप आटोळे, अर्जुन कचरे, संतोष पालांडे, मोहन जाधव, ज्योती सांगळे, दत्तात्रय भोसले, लक्ष्मण मुळे, संभाजी मंडलिक, श्रीकांत बुकन, रमेश गाढवे, दीपक माकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय घोळवे यांनी तर आभार नीलेश मातणे यांनी मानले.