नवी सांगवी : सांगवी वाहतूक विभागातील अधिकारी, कर्मचार्यांना नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्यातर्फे 54 रेनकोटचे वाटप केले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रभाकर ढमाले, वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अशोक मोराळे, सांगवी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, उपनिरीक्षक आटोळे आदी उपस्थित होते. ढमाले आणि नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या हस्ते रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांना पावसामुळे काही प्रमाणात अडथळा होतो. रेनकोट असल्यास असे अडथळे राहत नाहीत. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहील, असा विश्वास ढमाले यांनी दाखविला.