सांगवी : पिंपळे सौदागर येथील चिवा स्पा शॉप या स्पा सेंटवर छापा टाकत मसाज सेंटरच्या नावाखाली चाललेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळारून थायलंडच्या पाच युवतींची सुटका केली. तर मसाज पार्लर चालवणार्या दोघांना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री करण्यात आली. अमोल खंडू जाधव (वय 31, रा. कोकणे चौक, मुळ रा. कोल्हापूर) व दिलू गुआनडे जिबा (वय 21, रा. ताडीगुत्तास चौक मुंडवा, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मध्यरात्री टाकला छापा
पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी काल मध्यरात्री छापा टाकला. यामध्ये थायलंडच्या पाच मुलींची सुटका करण्यात आली. तर 3 हजार 500 रुपये, एक मोबाईल, असा मुद्देमाल जप्त केला. काही दिवसांपूर्वीच बाणेर-औंध लिंक रोडवरील उच्चभ्रू सोसायटीत मसाज सेंटरच्या नावाखाली चालणारे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उद्ध्वस्त केले होते. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळारून थायलंडच्या पाच, तर 1 भारतीय युवतीची सुटका केली होती. तसेच, मसाज पार्लर चालवणार्यासह तिघांना अटक केली होती.