सांगवी : महिलेला लग्नाचे अमिष दाखवून गेल्या दिड वर्षांपासून बलात्कार करणार्या तरूणावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान उल्हास चव्हाण (रा. प्रथमेश अपार्टमेंट, विशालनगर, पिंपळे-सौदागर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चव्हाणने महिलेला लग्नाचे अमिष दाखविले. गेल्या दिड वर्षांपासून महिलेवर बलात्कार करून लग्नाला नकार दिला. यामुळे महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. सांगवी पोलिस तपास करत आहेत.