सांगवी खुर्द अत्याचार प्रकरण : आरोपीची कोठडीत रवानगी

भुसावळ : यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना 26 जानेवारी रोजी उघड झाली होती. या प्रकरणी दोन अल्पवयीनांसह सज्ञान आरोपी सतीश प्रभाकर धनगर यास अटक करण्यात आली होती. सोमवारी मुख्य आरोपी सतीश धनगरची कोठडी संपल्याने त्यास भुसावळ विशेष सत्र न्यायालयाचे न्या.आर.एम.जाधव यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता 13 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपी सतीश धनगरतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण आर.पाल यांन काम पाहिले. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.